७. काशीविश्वेश्वर महाराजांची भेट
त्या आवाजानी मला सांगितलं एके दिवशी, ‘तू देवळाले रेल्वेस्टेशनवरती जा. तिथे काशी एक्सप्रेस येईल. त्यातून एक व्यक्ती खाली उतरेल. तो तुला पुढचा मार्ग दाखवेल.’ पुढे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी गेलो. अकरा - साडेअकरा वाजता ट्रेन येऊन गेली होती. एक्झॅटली सांगू शकत नाही, पण पाच-दहा मिनिटे ट्रेन जाऊन झाली असावीत. फलाटावर तर कोणी खास माणूस दिसला नाही. तिकट नव्हतं अशा एका माणसाला टिसीने अडवून धरला होता आणि तिथे बरीच गर्दी जमली होती. शेवटी टीसी त्याला स्टेशन मास्तरांकडे घेऊन गेला. मी आपला पहायला तिथं गेलो. बायचान्स तिथे चितळे नावाचे स्टेशनमास्तर होते. त्यांना मी ओळखत नव्हतो किंवा तेही मला ओळखत नव्हते. पण नावाने त्यादिवशी आमची पहिली ओळख झाली. त्यातिकिट नसलेल्याव्यक्तीला उद्देशून ते म्हटले, ‘तुम्ही तर संत दिसताय.’ वाढलेली दाढी, अतिशय बलाढ्य देह, अंगावर फक्त खाली धोतर व वर बंडीसारखं घातलेलं अशी मोठी मूर्ती तिथं दिसली. मास्तरांनी विचारलं, ‘तुम्ही तिकिट का काढलं नाही? त्यांनी म्हटलं, ‘काय असतं तिकिट? ते म्हणाले, ‘तिकिट हे असं असतं’ म्हणून त्यांनी आपल्याजवळील तिकिट काढून दाखवलं.
‘ह्यो काय? ह्यो तर असन माझ्याकडं.’ म्हणून खिशामध्ये हात घातला आणि एकदम जवळजवळ दहापंधरा तिकिटं काढून त्यांना दाखवली. तेव्हा स्टेशन मास्तरनी त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं. म्हणाले, ‘क्षमा करा महाराजा. माझ्याकडून चूक झाली. अहो आम्ही संसारी आहोत. आमची ऐवढी लायकीच नाही. क्षमा करा. तुम्हाला बोललो.’ तेव्हा पाच-सहा लोकं एकदम धावत स्टेशनमास्तकडे आले. म्हणाले, ‘काय झालं? काय झालं? अहो हे स्टेशनवरून एकाएकी गाडीत बसले. आम्ही इगतपुरला उतरलो होतो सगळे. तेवढ्यात हे गाडीमध्ये बसले आणि पुढे आली. म्हणून कारने येतोय म्हणे. प्रत्येक स्टेशन चेक करत. तरी थोडा उशिर झाला म्हणे. ट्रेन निघून गेली. आम्ही विचारलं तर काहीकाही घडलयं. म्हणून बाबाच असतील म्हणून आम्ही धावत आलो. आम्ही त्यांचे शिष्य आहोत. काय असेल ते तिकिट द्यायला तयार आहोत. याचं नाव ‘बाबा काशि विश्वेश्वरनाथ’ असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मला पाहिल्यावर म्हणाले, ‘हे भुत्या, अरे काय करतोयस तु. मी इकडे तिकडे पाहिलं. हा तुला तुलाच बोलतोय. चल माझ्याबरोबर.’
वाचा अन कळवा
ReplyDeleteकळवा
ReplyDelete