३. सिंदखेडला तांत्रिकांना हिसका
पुढे काही वर्षांनी 1966 साली मी गावी आलो असताना मित्राबरोबर सिंदखेड राजा येथे फिरायला गेलो. संध्याकाळी परत येत असताना खूप गर्दी एका ठिकाणी जमलेली पाहिली. पुढे जाऊन पाहिलं लोकं रिंगण घालून बसले होते. कोणाच्या हातात लिंबू होतं, कोणाच्या हातात गुलाल होता, कोणाच्या हातात कुंकू होतं. कोणाच्या हातात अंडी होती, कोणी कोंबडी – बकरीला धरून बसलं होतं आणि एक तांत्रिक एका बाईचे केस हातामध्ये धरून जोरजोराने ओढत होता. ती बाई रडत होती. ती दयेची याचना करत होती. पण कोणी पुढे येत नव्हतं. त्या मुलीला पाहून मला माझ्या बहिणीची आठवण झाली. माझ्या बहिणीने असचं भोगलं होतं. मी पुढे झालो. सांगितलं, ‘दादा तुम्ही हे काय करता. अहो हिचं केस सोडा. ही आपली आहे. हीला किती वेदना होतायत.’ पण त्याने काही माझं ऎकलं नाही. परत तेच मुंडकं तेच अर्क समोर मांडून काहीतरी खेळ चालला होता. माझ्यासोबत असलेले मित्र मला म्हणाले, ‘अरे जाऊ देत चल. आपण पुढे निघू. आपल्याला काय करायचय. पण मला एक सारखी बहिणीची आठवण येत होती. मी पुढाकार घेतला आणि सांगितलं, ‘मी हिला बरी करतो.’ ते म्हणाले, ‘तु बरी करतो? ‘हो मी बरी करतो.’
‘करून दाखव. तु जर करून दाखवलस तर आम्ही तुझ्या चरणावरती डोकं ठेऊ अक्षरशः डोकं ठेऊ. आम्ही इथे दारू पितोय, हे मटण इथे तयार केलय हे त्या पिशाच्च्याला देण्यासाठी आहे. आम्ही तो प्रसाद म्हणून फक्त घेतोय. आम्ही काही इथे नशापाणी करीत नाहीत.’
‘मुर्खा चालायला लाग इथून.’ मी त्यांच ऎकलं नाही. पुढे झालो. दोनतीन जणं मला मारायला धावले. पण त्यातला मुख्य तांत्रिक म्हणाला, ‘बाजूला व्हा. पोराला हात लावू नका. बघु तर खरा हा काय करतो. पाच मिनिटांनी आपोआप वापस जाईल. किती केल तरी तरूण रक्त आहे. त्यामळे जोर चढलेला आहे. पण त्याला माहित नाही पिशाच्च काय असतं ते.’
खरं म्हणजे मलाही माहित नव्हतं पिशाच्च काय असतं. मी पुढाकार घेतला. हातामध्ये थोडेसे तांदूळ घेऊन परमेश्वराचं स्मरण केलं कुणाचं केलं हे सुध्दा आठवत नाही. कारण मला काही एक कळत नव्हतं. त्यापूर्वी मला नाथांचा साक्षात्कार झाला होता 1959 मध्ये. तो नाथांची शक्ती माझ्याबरोबर आहे अस मला वाटत होतं. नाथ म्हणजे "सदगुरू जालंदारनाथ". त्यांनी अनुग्रह दिला मला. मी पुढे झालो. नाथांचं स्मरण केलं. तांदूळ टाकले आणि ती मुलगी हळूहळू बेहोश होत गेली. ती पडल्याबरोबर ‘म्हणे ही मेली आता तु सांग बरं काय करशिल.’
मी म्हटलं, ‘मुर्खांनो ती मेलेली नाही. तीच्यातलं पिशाच्च निघून गेलेलं आहे.’ तीच्या तोंडावर पाणी मारलं. ती शुध्दीवर आली. ती बरी झाली. सगळ्या मांत्रिकांनी येऊन ताबडतोब माझ्या पायावर डोकं ठेवलं. ‘कोण आहात साहेब, तुम्ही कोण आहात?’ त्यांना सांगितलं मी देऊळगावराजाचा आहे. ते म्हणाले, आम्ही देऊळगावराजाला जात असतो. पण तुला कधी तिथं पाहिलं नाही. कोण आहेस तु? मी म्हटलं, देऊळगावराजाच्या माधवराव पाटलांचा मुलगा आहे . मानसिंगपुऱ्यामध्ये राहतो. ते म्हणाले, ‘तु मिलिट्रीमध्ये तर नाहीस?’
मी म्हटलं, ‘हो. मी सध्या मिलिटरीमध्येच आहे.’ मग मला म्हणाले, ‘आम्ही असं ऐकलयं. तुझ्याबद्दल खूप ऐकलय. तु काय नाथपंथी आहेस का?’ मी म्हटलो, ‘मी नाथपंथीय आहे. पण मला काही येत नाही.’ ते म्हणाले, ‘बाबा, तुला काही यायची गरज नाही. आम्ही खूप ऐकलयं आम्हाला क्षमा कर. आमचं चुकलय. जमलं तर आर्शिवाद दे. तुझ्या विद्येतील थोडीतरी विद्या आम्हाला दिली तर आम्ही लोकांचं कल्याण करू.’
वाचा आणि कळवा.
ReplyDelete