Figure 9 बाबा जालंदर नाथ
6. जालंधर नाथांचा शेवटचा प्रत्यक्ष अनुग्रह!
माझी नाथ म्हणजे कोण येथून सुरूवात. कारण आम्हाला फक्त हनुमंत माहिती. शंकर, बालाजी, गणपती एवढे थोड्या देवता माहिती होत्या. बाकी काहीच माहिती नव्हतं. म्हणून तो शोधायचा खूप प्रयत्न केला. मग कोणी काहीकाही दंतकथा सांगितल्या. कोणी म्हणाले ते फार तांत्रिक असतात. दिवसा बायकांना कुत्रे करतात रात्री बायका करतात त्यांना भोगतात असं लोकांनी काहीकाही सांगितलं. मी म्हटलं काही का असेना मला त्याच्याशी काय घ्यायचं नाही. म्हणून त्या स्वप्नाची वाट पाहत बसलो. रात्र झाल्याबरोबर झोपलो सुध्दा नाही. ऐरव्ही संध्याकाळी सातलाच झोपायचो आणि मग बारावाजता झोप मोडायची आणि रात्रभर झोप लागायची नाही. एकसारखी भीती वाटायची. हृदय धडधड करायचं. मग मी त्याची वाट पाहत बसलो. जागा राहिलो. आता झोपलोच नव्हतो. डोळे मिटून बरोबर बारावाजता बसलो. बसल्याबरोबर ते समोर प्रगट झाले. प्रगट झाल्याबरोबर पहिल्यावेळेस मी त्यांच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि तो शेवटचा लास्ट दिवस. सहा महिने ते रोज येत होते. ज्यादिवशी त्यांच्या चरणावरती डोकं ठेवलं त्यानंतर ते कधी इतक्या जवळ येवून बसले नाहीत. कधीसुध्दा नाहीत.
मग वेळ निघत गेला. हळहळू त्यांनी श्रीरंगावधूत महाराजांनी सांगितल्याप्रमाणे थोडीफार साधना सुरू केली आणि मला एअरफोर्समध्ये नोकरी लागली. मी एअरफोर्समध्ये गेलो. तिथे ड्युटी करून वेळ मिळेल त्यावेळेस पूजा करायला लागलो. असे दिवस निघत गेले आणि हळूहळू कानामध्ये आवाज यायला लागले. आधी बऱ्याच वाद्यांचे आवाज यायला लागले. हळूहळू शब्द कानावर पडायला लागले. महाराजांची मूर्ती दिसत नव्हती. पण कानामध्ये स्पष्ट आवाज येत होता.
वाचा आणि कळवा
ReplyDelete