आमचे चितळे बाबा

आमचे चितळे बाबा
आपल्या नेहमीच्या स्थानावर विराजमान

Wednesday, 18 December 2013

17. देऊळगाव राजा गावातील गमती जमती...


चितळेबाबा - वेदांचा अर्थ न कळे आम्हा !
दि. 24 डिसे. 2012 रोजी अनेक विषयांवर चर्चा करताना पु. चितळेबाबा वेद निर्मितीबद्दल विचारले तेंव्हा त्यांच्याबद्दल बाबा आपला अनुभव सांगताना म्हणाले, "एकदा मी एके दिवशी गुरू जालंघर महाराजांना अतिशय नम्रपणे विचारले, हे गुरू, चारी वेद जे अति श्रेष्ठ आहेत व ते व्यासांमुळे जगाला ज्ञात झाले आहेत. त्यांचे वान करायची इच्छा झाली आहे तरी मला आज्ञा द्या आधी त्यांनी काही सुचवले नाही म्हणून, पण नंतर पुन्हा विनंती केली तेंव्हा दृष्टांच देऊन ते म्हणाले, वाचूनिया वेद तुला होईल खेद । तयातील भेद तु न जाणे।।'  यावर मी पुष्कळ दिवस विचार करत होतो. नंतर मी तो विचार सोडला ते कळले ही नाही
देऊळगाव राजा गावातील गमती जमती...
बंधू श्री अशोक यांनी बाबांची आठवण लिहिताना म्हटले होते की एकदा वडिलांना अंथरुणातून उठून बसायला अशक्य झाले इतका अशक्तपणा आल्याने त्या तीव्र आजाराबद्दल आईने तात्याला तो सुटीवर आला तेंव्हा म्हटले, बघ त्यांना काय झालेय ते. पुढे त्यांनी म्हटले होते की तात्याने लगेच वडिलांचा आजार बरा केला. ते करताना वडील 2-3 फूट अधांतरी हवेत बराच वेळ होते. ते मी स्वतः पाहिले... नंतर अकस्मात बरे झाले याबद्दल त्यांनी म्हटलयं.
 ... ती गोष्ट आठवते का? असे मी बाबांना विचारले असता त्यावर चितळेबाबा म्हणाले, असेल बुवा. पण मग जेंव्हा हवेत वडील अधांतरी झाले त्याची घटना असे अशोकजींनी पुढे म्हटलेय असे विचारल्यावर बाबा पटकन म्हणाले, ते होय... हो,  आठवते की. अहो, ती तर भानामती झाली होती!  मंत्रून घालवल्यावर वडील नंतर बराच वेळ अधांतरी होते. व लगेच खडखडीत बरे झाले’.
गोविंदराव आफळे बुवांची फिरकी!
 आणखी एक मजेशीर घटनेची बाबांनी सांगितलेली एक आठवण...
ते म्हणाले, एकदा मी गावी सुट्टीत गेलो असताना असताना एकजण कोणी 'भूतनाथ' म्हणून आहेत त्यांना भेटायला लांबून आलोय म्हणत मला भेटायला आले. सोबत आमच्या गावातील बडे धेंड आबासाहेव बक्षी पण होते. मी बालाजी मंदिराच्या आसपास बिडीचे झुरके घेत होतो. त्या अवस्थेत मला पाहून ते ग्रहस्थ ओरडले, बिडी फेक आधी ती. मंदिराच्या पवित्र जागी हा काय अनाचार?’ म्हणून त्यांनी बाबांची कान उघाडणी करीत म्हटले.  
मला राग अनावर झाला. मी कोण आहे तुला माहीत आहे का? मी म्हणालो, ओ आणि कोण तुम्ही? तो देव सर्वत्र आहे. मग मी इथे बिडी प्यालो काय किंवा इतर ठिकाणी तर काय झाले?  वेशावरून दीड दमडीचा भिक्षुक तू दिसतोय, तुला काय करायचे आहे? आमच्या गावात दर्शनाला आलायस तर मग ते घे व जा... मघे पडत बक्षी म्हणाले, आफळे महाराज, अहो जाऊ द्या, त्याच्या नका नादी लागू. तो तसाच आहे!  आम्हाला गावात राहायचे आहे. आपण कशाला उगीच त्याची छेड काढता आहात.  
आबासाहेब पुढे  म्हणाले, अहो आपण ज्याला भेटायला म्हणून इथे आला आहात ते हेच भूतनाथ होत! 'अरे बापरे', म्हणत आपला ताव सोडून आफळे बुवांनी बाबांना विनंती केली, महाराजा, एका नाथपंथीय औलियाना भेट असा मला स्वप्नात आदेश आला म्हणून मी खूप शोधाशोध करून आपला माग काढत इथवर आले आहे. आपली माझ्याकडून आगळीक झाली त्याबद्दल मला माफ करावे. दुसऱ्या दिवशी मग 'आहेर करू इच्छितो' म्हणत धोतर-नारळ घेऊन सकासकाळी, आहेत का धनू?’ म्हणत ते आत आले. त्यावेळीचा माझा अवतार वेगळाच होता. कारण माझे वडील तेंव्हा पॅरेलेसिसने आजारी होते. विकलांग झालेले. त्यांची विष्ठा काढावी लागत असे. तसे करताना त्यांनी मला पाहिले. हात धुवत धुवत मी आफळे महाराजांना सामोरा गेलो. मातापित्यांची सेवा करताना कसली आलीय लाज?... माझा अवतार पाहून आफळे बुवांचा रागरंग बदलला होता. नाथ महाराजांची आपल्यावर कृपा झाली आहे असे कळल्याने प्रत्यक्ष भेटील आलो होतो. वडीलकीच्या नात्याने बोललो त्याचा राग मानू नये...
*ते होते राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून ख्यातनाम गोविंदराव आफळे बुवा... नंतर अनेकदा बाबा त्यांच्या कीर्तनाचा आस्वाद घेतला.

 वरील घटनेचे एक साक्षीदार होते प्रतिष्ठित धुंडिराज महाराज कवीश्वर म्हणून. त्यांचीही एक मजा आता सांगतो. एकदा धुंडिराज कवीश्वरांना दृष्टांत झाला की त्यांना पुढचा मार्ग तो (धनू) दाखवेल. ते म्हणजे, सध्याच्या दत्त महाराजांचे वडील. धुंडिराजजी 104 वर्षे जगले. त्यांचे वडील वक्रतुंड महाराज. त्यांच्याबद्दल निजामाच्या राज्यात त्यांनी सुर्यास्त थांबवला अशी नोंद आहे. तर त्या धुंडीराज महाराजांची आधीची एक आठवण बाबांनी सांगितली. ते म्हणाले, धुंडिराज महाराज, एकदा रस्त्यात गाठ पडले व म्हणाले, 'मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी भेटाला तुझ्या घरी येऊ काय? का बरे, मी त्यांना म्हटले, आपण कशाला कष्टता, मीच आपल्या घरी येतो ना. तसा गेलो. ते मला म्हणाले, महाराज नमस्कार, आणखी किती आयुष्य मला आहे?  आज प्रश्न विचारायच्या वेळी आम्ही 103 वर्षांचे झालो. 4 मुले 80 च्या वर गेली. आम्हा अजून किती राहिलेत?  यावर मी  एकदम म्हणालो, 'वासनांची तृप्ती नाही म्हणून अडकला आहात.' माझ्या न कळत इतक्या वृद्ध व्यक्तीला मी का असे म्हटले माहीत नाही. पण तरीही तसे उत्तर दिले खरे. मी पुढे म्हणालो, उत्तरायण लागले की 17 दिवसांनी म्हणजे 7 जानेला अंतिम वेळ असेल. ते नेमके त्याच दिवशी निवर्तले.

Wednesday, 7 March 2012

16. “शीघ्र कवी चितळेबाबा”

शीघ्र कवी पुज्य चितळेबाबा

अलख निरंजन अलख निरंजन ।
नाम प्रभू का अलख निरंजन। सब का  धर्मों का एकही भंजन ।।
अलख निरंजन अलख निरंजन।

वरील प्रार्थनेच्या काव्य निर्मितीची रंजक माहिती नुकतीच बाबांनी सांगितली. ती ही एक शीघ्र काव्य करून! तेच आपल्याला त्यांच्या आवाजात  इथे सादर करत आहे. (इथे वर क्लिक करावे. मग बाबा प्रार्थना नावाचा पट्टा उलगडेल.त्यावर शेंदरीगोलातील बटन दाबावे. मग काव्य लोड होण्यास सुरवात होईल. त्यानंतर पुन्हा शेंदरी गोलात बटन दाबावे.)
पुज्य बाबा आग्रा येथे पोस्टींगला असताना साधकांचा उपद्रव वाढला. त्या भागातील प्रथेप्रमाणे लोक कोणी त्यांचे पाय चेपून किंवा ढोलकीवर भजन मंडळी जमवून त्यांचे मनरंजन व शारीरिक सेवा करू लागले. 
काही काळाने बाबा वैतागले. या लोकांना घरबसल्या काही म्हणायला दिले तर ते इकडे यायचे नाही असा वाटून गुरूंच्या आशीर्वादाने त्यांनीवरील काव्य रुपी प्रार्थना काही मिनिटात बनवली आणि अल्प काळात ती अनेकांच्या मुखी रुळली. आपलीशी झाली.
हे सर्व कथन मजेत करत असताना पुज्य बाबांनी या घटनेला बोलता बोलता ओवीरुपात बांधून आपल्या शीघ्र काव्यनिर्मितीची चुणून दाखवली.


Sunday, 1 January 2012

15. अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन।प्रार्थना

अलख निरंजन अलख निरंजन ।

प्रार्थना

रचनाकार - पुज्य चितळेबाबा.

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन।

सब धर्मों का एक ही भंजन ।। नाम प्रभू का अलक्ष निरंजन। ।।ध्रु।।

सब शक्ति का एकही भंजन । नाम गुरू का अलख निरंजन।
चौ वेदों का एक ही भंजन । चौ मितियों का एक ही रंजन ।

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन। ।।1।।

चली शाबरी शक्ति ऐसी । इस दुनिया की ऐसी वैसी
कोई नही किसी का इस दुनिया में । अकेले आना अकेले जाना ।
इस दुनियासे क्या लेना । य़े तो सारे संगी साथी ।जैसे शादी के बाराती।

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन। ।।2।।

ब्रह्म रुप सब तेरी माया। मां के गर्भ में स्थान दिलाया ।
बहुत नरक यातना पाया ।सो हम् मंत्र का जाप किया।

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन। ।।3।।

तब तो दिया मुझे झुटकारा । जैसा मिला मुझे झुटकारा ।
कोहम् मंत्र का मारा नारा । बहु कष्टों से पाई काया ।
बचपन खेल में बीत गया । तभी न मैंने तुझको पाया।
दिन ब दिन बढ़ गई काया । फिर प्रभूजी चढे जवानी । जैसे चाहे कर मनमानी।
षङ्रिपु की शक्ति ऐसी । भक्ति की हो गई ऐसी वैसी।
किस कारण मैं ने जन्म लिया । क्या तुझ से जो वादा किया ।।
सब कुछ मैं जो भूल गया। अहः तत्व ने जन्म लिया ।

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन। ।।4।।

आयी जवानी आयी जवानी ।आयी जवानी गयी जवानी।
गई जवानी आया बुढापा। जगह जगह पर पाया धोखा।
झुटे रिश्ते झूटे नाते । ये तो सारे आते जाते । क्षण में सारे बदलते जाते।

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन। ।।5।।

चार वेद है । कई मंत्र है। कई साधु है । कई संत है।
कई धर्म है। कई पंथ है। किस रस्ते से कैसे जाऊं ।
प्रभुजी तुझको कैसे पाऊं। गुरूजी तुझको कैसै पाऊं।
मैं मुढ़ मति हूं। मैं अज्ञानी। जैसे चाहे कर मनमानी।

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन। ।।6।।

कई नाम तू धारण करता । कई धर्मों में आता जाता।
सब दुनियासे तेरा नाता।
कभी बनता नर कभी बनता नारी। माया तेरी ये है सारी ।

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन। ।।7।।

किस नाम से तुझे पुकारू ।

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन।

कहत गुरू -
अलक्ष निरंजन मंत्र जो गावे। प्रभू उसीकी साथ निभावे।

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन। ।।8।।

अनाहत की ऐसी शक्ती। चरण में तेरे मेरी भक्ती।
षड़चक्रों को जागृत करना। तेरे चरण का मार्ग दिखाना।।

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन। ।।9।।

भवसागर से मुझे क्या लेना। चाहे दे तू पार कर देना।
आगे कहीं में जहा भी जाऊं । जिस योनी में जहां भी जाऊं।
सब कुछ मैं जो भूल गया। अहः तत्व ने जन्म लिया ।

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन। ।।10।।

जहां कहीं मैं जन्म ही पाउं। उसकी मुझको नहीं है चिंता।
एकही वर जो मुझको देना । इस दिन को भूल न जाना।।
हरदम आपके चरण रखना

अलख निरंजन अलख निरंजन । नाम गुरू अलख निरंजन।

सब शक्ति का एकही भंजन ।। नाम प्रभू का अलक्ष निरंजन । ।।11।।

या प्रार्थनेची निर्मिती कशी व कुठे झाली
सांगतायत बाबा शीघ्र कवन करून...
ते शीघ्र कवी चितळेबाबा या शीर्षकात वाचा...

Monday, 12 December 2011

१५.गिरनार पर्वतावर बाबांची - गुरूंशी भेट

गिरनार पर्वतावर बाबांची - गुरूंशी भेट


गिरनार पर्वतावर चढायच्या १०,००० पायऱ्यांचा बिकट मार्ग
सादरकर्ता -  शशिकांत ओक, नविन तम - दि. 24 फेब्रुवारी 2012

‘मला आदेश आलाय 'भेटायला गिरनार पर्वतावर ये! मी चाललो केव्हा परतेन माहित नाही.' सगळे भक्तगण आणि घरचे लोक हादरले. मार्च 2011 ची ती सुरूवात असावी. झाले, बाबा जाणार गिरनारला म्हणून चर्चा सुरू झाली आणि बाबांनी आपले प्रयाण अहमदाबाद येथे केले. पुढे सात दिवसांनी बाबा परत आपले गुरूवारच्या पुजेला हजर! सगळ्यांना हायसे वाटले आणि शिष्यगणांना गुरूंची भेट कशी झाली याबद्दल उत्सुकता लागली.

सौराष्ट्र भागातील जुनागढ यापूर्वीचे संस्थान राजधानीचे स्थळ. स्थळापासून काही किलोमीटर अंतरावरील रिझव्ह फॉरेस्ट मधे सिंहाची पैदास व राखण केली जाते. याच गीरजवळ गिरनार पर्वतावर अनेक नरशार्दुल गेल्या हजारो वर्षापासून वास्तव्य करून आहेत. दत्तात्रय, गोरक्षनाथ अशा नवनाथांनी व काही अन्य महाभागांनी कठोर तपश्चर्या करून तेथे वास्तव्य केल्याच्या खुणा गुहा आणि गिरीकंदरातून मिळतात.साधारण तीन हजार पायऱ्यांपाशी जैन तिर्थंकारांचे वास्तव्यही या पर्वतावर असल्याने गिरनार पर्वताची यात्रा भारतीयांना शेकडो वर्षापासून आकर्षित करते. बाबा म्हणजे आमचे चितळे बाबा, त्या भेटीचे वर्णन करताना म्हणतात, ‘जवळजवळ दहा हजार पायऱ्याचा तो मार्ग माझ्यासारख्या सत्तरी उलटलेल्या व्यक्तीला पाहून भयचकित व्हायला होते. गुरूंचे निमंत्रण, निश्चय व धीर करून मी निशंकपणे पायऱ्या चढायला लागलो.

सकाळी सात-सव्वा सातची वेळ असेल. शंभर सव्वाशे पायऱ्या चढल्यावर आता पुढे एक पाऊल टाकणे शक्य नाही असे वाटून मी प्रार्थना केली, 'मला माफ करा, महाराजा! आपल्या दर्शनाला मी येऊ शकत नाही. इथुनच मला परतण्याची परवानगी द्या' असे मनोमन म्हणत लागलेली धाप शांत होते न होते तोवर असा चमत्कार झाला की परत फिरायचे सोडा नंतर फारसे कुठेच न थांबता एकदम साधारण आठ हजार पायऱ्यांपाशी गोरक्षनाथांची गुहा आली. तेथे थांबणे झाले!
चढणारे आणि उतरणारे यांची गर्दी तुरळक होती. त्या गुहेपाशी आल्यावर थोडासा विश्राम घेऊन गुहेचे दर्शन घेण्यास मी पायऱ्यांवरून तिकडच्या वाटेला लागलो. गुंफा म्हणजे काय? साधारण एक छोटीशी खोली असेल इतपत दगडाची खोबण! वज्रासनात बसण्याएवढी जागा! अंधार आणि शांतता!
प्रत्यक्ष गुहेपाशी एक वृध्द किलकिले डोळे करून वाटेत बसलेले. त्यांनी बाबांना भुवया उंच करून विचारले, 'क्युं आए हो?' ते गोसावीवजा व्यक्तिमत्वाचे वृध्द पाहून बाबांनी म्हटले, ‘गुरू के दर्शन के लिए आया हूँ।‘ असे म्हणून बाबांनी ‘अलख निरंजन’ अशी जोरदार हाक दिली. त्यावर त्या गोसाव्यांनी 'अल्लख निरंजन' असे प्रत्युत्तर दिले आणि म्हटले, ‘यहाँ तो कोई गुरू या बाबा है नही। ये तो खाली गुफा है।‘ म्हणून गुहेकडे बोट केले. बाबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पटकन सुलगावलेल्या बिडीचा एक दीर्घ झुरका घेत म्हणाले, ‘देखते है।‘ त्यावर ते गोसावीबाबा म्हणाले, ‘पता नही कितने लोग आये और चले गए। तुम्हें क्या वहाँ देखने को मिलेगा? खाली पत्थर!’ पुन्हा बाबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून म्हटले, ‘जो होगा वो गुरू देख लेंगे. मेरे लिए तो गुरूका बुलावा आया हुआ है। इसलिए मैं आया हूँ। आगे का वो जाने।‘
आता त्या गोसावीबाबांनी मान डोलावली, ‘ठीक है, तो आप जाओ अंदर। तिथे एक स्वस्तिकासारखे चिन्ह ढकलून पाहा.’ असे म्हणून स्मित हास्य केले. बाबांनी पुन्हा एकदा ‘अलख निरंजन’ असे म्हटल्यावर गोसावी बाबांनी ‘अलख निरंजन’ असे त्याला उत्तर दिले आणि ते समोर ठेवलेल्या राखेच्या ढिगाकडे पाहत बसले.

बाबा त्या गुहेत म्हणजे एक दहा बाय बाराच्या एका खडकाच्या कोनाड्यात जवळ गेले. स्वस्तिका प्रमाणे खूण असावी त्या खडकावर दरवाजा समजून साशंकतेने जोर दिला. जणू काही एखादा पुराणा दरवाजा उघडण्यासाठीच तयार होता! एक वाट तयार झाली आणि बाबा आपसुकपणे आत गेले आणि मागनं पुन्हा तो दगड एकमेकात चिकटून गेला. एकदम अंधार झाला. मिट्ट अंधारात काही कळत नव्हते. छातीची धडधड वाढली होती. हे काय अघटित झालय या विचाराने मन धास्तावले होते. नक्की काय घडलय याचा थांग लागेना आणि बाबा व्याकूळ झाले. हळूहळू मनाची शांती झाल्यावर त्यांच्या डोळ्यांना प्रकाशाची जाणीव झाली
.... आणि त्या प्रकाशात एक धीरगंभीर, भव्य रूप समोर आढळले.
‘आओ, मैने बुलालावा भेजा था।‘ बाबांची विचारणा झाली आणि बाबांची क्षणभर बोबडीच वळली.
……
पुढे बाबा म्हणतात, ‘मी साधारण तेथे अर्धा तासापेक्षा कमी म्हणजे सत्तावीस मिनिटे होतो. त्यावेळात त्या प्रखर व्यक्तिमत्वाच्या आभा वलयात मला अनेक गोष्टींचे खुलासे केले. काही चुका, काही अक्षम्य चुका व वर्तमानस्थिती व पुढील कार्याची दिशा यांचा झाडा घेऊन त्यांनी माझ्यावर सतत लक्ष असल्याचे दर्शवून दिले.’
‘आता तरी यापुढे सावध रहा’ असा सल्ला देऊन म्हटले, ‘आतातरी तुझी साशंकता गेली की नाही?’ हे पाहण्यासाठी तुला इथे भेटण्याचा आदेश दिला. इथे आलास यातून तुझी परीक्षा झाली.’
........ बाबांनी हात जोडून त्यांच्याकडे पाहून मानेने हो म्हटले आणि त्या कमी होत जाणाऱ्या प्रकाशाकडे पाहून डोळ्यातील घळघळणारे अश्रू सावरले. ‘गुरू महाराजा, चुका पदरात घ्या. सांसारिक जगात वागताना आपसुक चुका होतात. नंतर जाणीव होते की तेही एक माझ्याकडून करून घेतले जाणारं नाटक आहे. याची जाणीव मला सतत आहे. आपल्या आर्शिवादाने.’ बाबांनी पुन्हाःपुन्हा हात जोडले आणि प्रार्थना केली माझ्याकडून गुरूप्रेरणेने सतत आदेश मिळत राहोत आणि आयुष्याच्या अंतापर्यंत ते जनकल्याणाकरिता सदा उपयोगी ठरोत. आजचा दृष्टांत माझ्या आयुष्याचा अविस्मरणीय भाग ठरो.’
….प्रार्थना संपत नव्हती. पाय भरून आले होते. घामाच्या धारा होत्या. अंधारात चाचपडत. जिथे तिथे जोर लावून ढकलण्याचा प्रयत्न केला. पुन्हा खडक सरकून दरवाजा झाला. त्यातून मी बाहेर आलो. दुपारचे बारा वाजून गेलेले. बाहेर लोकांची ये-जा. ते गोसावीबाबा धुनीपाशी बसलेले. सत्यातील जगाचे चित्र माझ्या डोळ्यासमोर हळूहळू तरळू लागले. तेव्हा नुकताच झालेला तो अदभूत अनुभव सत्य होता याची पूर्णतः खात्री पटली.
‘क्यूं, क्या हुआ? असे म्हणून गोसावी बाबांनी मिचमिच्या डोळ्यांनी पाहिले. बाबांनी ‘अलख निरंजन’ म्हटले. त्यांनी दिलेली उदी कपाळाला लावली. अन त्यानंतर जे घडले ते अदभूत होते.' अलख निरंजन' पुकाराकरून गोसावी बाबाने माझ्याकडे पहात माझ्या हातात सात रुद्राक्ष आणि एक पांढऱ्या रंगाचा मोत्यासारखा खडा दिला! जणु ते सर्व माझ्यासाठी तयारच ठेवलेले होते! त्या वेळी क्षणभर वाटले, आत भेटलेले व्यक्तिमत्व तेच तर नव्हते? ‘अलख निरंजन’ चा पुकारा करत करत बाबा पुढे निघाले.
                             

                                 हेच ते सात रुद्राक्ष आणि मोत्यासारखा खडा.

बाबांचा हा अनुभव आम्हा शिष्यगणांना अदभूतकथन वाटते होते. नंतर वेळोवळी बाबांनी त्या घटनेचा उल्लेख केला. म्हणाले, ‘पुढे घसरगुंडीसारख्या जागेतून गेल्यावर, तो पहाड खाली उतरून पुन्हा दुसऱ्या पहाडावर चढण्याची एक जिकिरीची चढण चढून साधारण दहा हजार पायऱ्या चढून गुरुदत्तांचे स्थान आले.
तेथे बाबा दर्शन घेऊन परतले आणि वेगळ्या प्रकारची चमक जाणवली. त्यांचा हा अनुभव ऐकून त्यांच्या घरातील मुलांनी गिरनार पर्वताची व त्या गोरक्षगूहेची यात्रा केली. ना तेथे त्यांना गुहेतील खोबण दिसली ना ते धुनीवाले बाबा...

.....असे आमचे बाबा, नवनाथांच्या विशेषतः जालंधर नाथांच्या, आर्शीवादाने अनेक मानसिक आणि शारीरिक व्याधी औषधोपचाराने दूर करण्याने प्रत्येकाचा योगक्षेम साधण्यास सदैव तत्पर असतात.
... दर गुरूवारी त्यांच्याकडे सायंआरती मोठ्या आनंदाची असते. . शिवाय नवरात्रात देवीचे अधिष्ठान, अशा बाबांच्या काही आठवणी....
’अलख निरंजन!’


श्री अवधूत चिंतन दत्तात्रेय मंदिर, गिरनार धाम.

जुनागढ जवळ गिरनारचा नकाशा

१४.कर्नल यादवांच्या घरी घडलेला किस्सा

आसामात ओळख झालेल्या कर्नल यादवांच्या घरी घडलेला किस्सा

संकलन - दि २७ ऑक्टोबर २०११.
असा अपमान कधी झालेला नव्हता !
आम्ही सहज गप्पा मारत असतान एक फोन आला. तो बाबांनी घेतला. तो खाली ठेऊन मग बाबा म्हणाले, आलेला फोन कर्नल यादवांचा होता थांबा तुम्हाला त्यांचा तो किस्सा सांगतो.. आम्हादोघांचा पुर्व परिचय हवाईदलातून झाला असल्याने बाबांना माझ्याशी बोलताना सहजच आर्मी व हवाईदलातील काहींच्या कथा सुनवायला हुरूप येतो. मी सरसावलो. मोबाईलवरील रेकॉडींगची तयारी करून तो बाबांच्या हाती देत त्यांना म्हटले, आता सांगा. हे रेकॉर्डींग नंतर मी मोबाईलवरून कॉम्पवर काढून ते एकांना ईमेल करून त्यांना टायपिंगकरायला पाठवले गेले. ते आपल्याला बाबांच्या आत्मकथनातून सादर होत आहे. 
 आसाम में बाबा के साथ.. कुर्सीपर कर्नल तिहोतिया,पीछे खडे... कर्नल दीप, कर्नल यादव तथा श्री. पवन अग्रवाल...बैठे सुभेदार, JWO दीक्षित, ब्रिगेडियर तोमर             
बाबा सांगतात,1996 मध्ये मी रिटायर्ड झालो. रिटायर्ड होण्यापूर्वी एक वर्ष आधी मी आसामला होतो. तिथं कर्नल यादवांची भेट झाली. पुष्कळ सामान्य शिपायापासून ते कर्नल ब्रिगेडियर वगैरे पर्यंत अनेक तेथे माझे शिष्य झाले. त्यातच कर्नल यादव होते. तिथे खूप चांगले वास्तव्य झाल्यानंतर मी इथे पुण्याला बदलून आलो. एकदा यादवांनी फार आग्रह केला म्हणून 1997 साली त्यांच्याकडे गेलो. तिथे त्यांनी माझं आदरातिथ्य इतकं केलं की ते शब्दाने वर्णन करता येत नाही. सगळं साजुक तुपामध्ये जेवण! हे! ते! हात पाय दाबून सेवा काय करणे, फळे खाऊ घालणे, वगैरे-वगैरे. असं होत असताना आता मी दुसऱ्या दिवशी निघणार, त्या रात्रीची गोष्ट. एका-एकी त्यांची मुलगी फार जोरात ओरडली. त्यावेळी त्या मुलीच वय असेल सतरा-अठरा. ती बारावी झाली होती किंवा होणार होती. आम्ही सगळे घरामध्ये धावलो. पाहिलं तर ती डोळे वाकडे तिकडे करून वेड्यासारखी काहीतरी पाहत होती, ओरडत होती.
मी तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिला बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी मी परत दिल्ली आलो आणि परत दिल्लीवरून पुण्याला परतलो. हे घडलं राजस्थान-हरयाणाच्या बॉर्डरवरच्या अलवरच्य़ा जवळच्या गावामध्ये. नंतर झाली गेली गोष्ट मी विसरून गेलो.
नंतर काही दिवसांनी त्या मुलीची पुन्हा तब्येत फार बिघडली. ती दिवसा-रात्री एकाएकी ओरडायला लागली. म्हणून तिनं बाहेरसुध्दा जाणं सोडून दिलं. मला यादवांचा फोन आला की, बाबा तुम्ही एकदा मुलीला येऊन पहा तिला काय झालंय ते कळत नाही. सगळे डॉक्टर-वैद्य झाले, देव झाले, तंत्र-मंत्र झाले, काळे कमळीवाले बाबा झाले. सगळ्यांचे सगळे उपाय झाले. कुठे काही गुणच पडत नाही.
नेमक्या त्याच वेळेस दुर्देवाने आमच्या बायकोला ब्रेन हॅमरेज सारखा प्रकार झाला आणि मला कुठेच जाता आलं नाही. मला तिच्याकडे खुप लक्ष द्यावं लागलं. पत्नीली काही ऐकु येत नव्हतं, दिसतं नव्हतं, एक सारखी खाली पडत होती आणि मुलं फार लहान होती. ती शाळेत शिकत होती. अबु आणि पप्पु. मोठी मुलगी- संजूचं नुकतच लग्न ठरत होतं. कॉलेज झालं होतं ती नोकरी करत होती. अशा परिस्थितीत मी दिल्लीला जाऊ शकलो नाही. पुढे दुर्देवाने त्यांचे मला धमकीचे फोन येऊ लागले की, हे तुम्हीच केलेलं आहे. तुमच्यामुळेच हे झालेलं आहे. जर तुम्ही माझ्या मुलीला नीट नाही केलं तर आम्ही जाट आहोत. आम्ही असं करू आम्ही तसं करू वगैरे वगैरे... त्यांच्या बायकोने सुद्धा मला फोनवरून शिव्या दिल्या. यादव साहेबांनीसुद्धा मला खूप डाटलं. त्यांनी मला असा टॉर्चर करायला सुरूवात केली. पण काही करू शकलो नाही. मी जाऊ शकत नव्हतो कारण बायको खूप सिरीयस होती.
तो काळ निघुन गेला. पत्नी ठीक झाली आणि पुढे पाच-सहा महिन्यांनी मला वेळ मिळाल्यानंतर मी दिल्लीला गेलो. तेथून पुढे मी यादवांच्या घरी पोहोचलो. त्यांनी माझं पुन्हा आदरातिथ्य केलं आणि म्हटलं, आपने बहुत बुरा किया। हमने ऐसा सोचा, वैसा सोचा असं खूप बोलले. असं एकएक दटावणीखोर बोल त्यांनी लावले. मला वाईट वाटलं. मी म्हणालो, माझ्या मनात आपल्याबद्दल पाप नाहीये. तुमचं सगळ्याचं मी कल्याण केलयं, तर माझ्या मनात तुमच्या मुलीबद्दल काही शंका नाही. मी तसा मनुष्य नाहीये. तुमची काहीतरी चुक होतेयं. मी प्रेमाखातर तुमच्या घरी आलो. तुम्ही माझा जो आदरसत्कार केलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. जिथं मनुष्य जेवतो, त्या थाळीला ब्राम्हण मनुष्य तरी भोक पाडत नाही.
तरी पण तुम्हाला हे मी केलय असं वाटतय तर ते माझं दुर्देव आहे मी त्याला काही करू शकत नाही. तुमाला काय करायचं ते करा. मी इथे आलेलो आहे. माझे तुकडे करायचे असतील तर करा.
त्यांचा रागरंग वाईटच दिसला. ते उर्मट भाषेमध्ये काही बाही बोलले. तरीही मी प्रयत्न करतो म्हणालो. मी यज्ञकुंड तयार केलं.
बाबांना थांबवून मी विचारले, ते बरे तयार झाले? बाबा म्हणाले, होना, त्यांना मुलगा बरी करून पाहिजे होती म्हणून त्यांनी तयारी केली.
त्याच्यासमोर मुलीला बसवलं. मी आवाहन करून प्रयत्न केला. रात्री नऊ वाजता आम्ही बसलो. दहा, अकरा, साडे अकरा काही उपयोग झाला नाही. ती माझ्याकडे पाहून हेटाळणीच्या सुरामध्ये हा-हा-हा हसायची. अरे तेरे जैसे बहुत देखे असं म्हणायची. परत हसायची. त्या हसण्यामध्ये एक कटुता दिसायची. आधीच मी गर्भगळीत झालेला. परगावी कर्नलच्या घरच्यांकडून अपमानित केलेला. त्यात जेसीओ म्हणून रिटायर्ड झालेला. आता काय करावं. काय करावं सुचेना. बाबा जालंधरमहाराजांना विनंती केली, कुलस्वामिनीला, महाबजरंगबलीला विनंती केली पण काय म्हणता कोणाकडूनही उत्तर येतच नाही अशी परिस्थिती झाली. हतबल झालो आणि ...
अचानक मला महाराजांनी चित्र दाखवलं. बाबांनी हातांनी हवेत गोलगोल करत म्हटले, गोल-गोल... मला आठवतं पिक्चर पाहत असताना कधीतरी असं गोलगोल काहीतरी दाखवायचॆ आणि आधी घडलेली घटना असं दाखवायचे. आणि माझ्या मनात आयडीया आली की हे पूण्यजन्मकर्माचं कारण तर नसेल. पिक्चरमध्ये दाखवायचे तसा तोपर्यंत याचा अनुभव कधीच आला नव्हता. हा पहिल्यांदा अनुभव आला. बॅकमध्ये काही घटना घडली असेल म्हणून म्हटलं हिला बॅक जन्मामध्ये घेऊन जावं. म्हणून हळुहळू स्वतः तिच्या बॅकमध्ये एंट्री केली आणि तिलाही खेचली त्या चक्रव्ह्यूहामध्ये. पन्नास, साठ, सत्तर, एंशी, दोनशे, अडीचशे, तीनशे, साडेतिनशे, चारशे, पाचशे, साडे पाचशे, सहाशे, साडेसहाशे, सातशे, आठशे, नऊशे, दहाशे, अकराशे, बाराशे वर्षे पुढे सरकत होती. ... गरगर...गरगर. एक एक जन्म...खटखट... तिच्याबरोबर मी आहेच... आणि एका जन्मात आल्यावर ती जोरात घोगऱ्या आवाजात ओरडली... व्हॉव व्हॉव करत... तिला मुळ रुपात मी पाहिलं. म्हटलं कोण आहेस ते सांग. ती हरामखोर, राक्षसीण होती. हा...हा... करून अंगावर आली. तिला म्हटलं आपल्यामध्ये इतकं अंतर आहे की तु माझं काहीच करू शकत नाही. हे अंतर तुझ्या बापालाही तोडता येणार नाही. पण मी मात्र प्रत्यक्ष तुझ्या या जन्मापर्यंत आलेलो आहे. मी तुला तोडू शकेन. हळूहळू तिने रागाचे रुप सोडून तरूण स्त्रीचं रूप धारण केलं. इतकी सुंदर नव्हती पण तरूण तरी नक्कीच होती आणि नमस्कार केला. म्हणाली महाराज, ही देवाची लीला आहे. तुम्हाला जर मला शिक्षा करायची असेल तर नक्कीच करू शकता. पण माझा याच्यात काहीसुध्दा अपराध नाही. मी राक्षसीण होते, कबुल आहे माझ्या हातून चुका झाल्या असतील देवाने त्यासाठी मला शिक्षाही दिल्या. काय द्यायच्या त्या. मी आता त्या योनीमध्येसुध्दा नाही. त्या योनीतून मी खूप दूर निघून गेलेली आहे. तुम्ही बोलावलं म्हणून यावं लागलं.
पण तु आहेस कोण?’ मी विचारले .. तुमच्या समोर बसलेली ती मीच आहे.’
पण ती घाबरते कशाला?... ओरडते कशाला?
काळाचा पडदा सरकला महाराजा आणि तिला आपलं पुर्वजन्मातलं स्वरूप दिसलं आणि ती ते भयानक रूद्र, भयंकर रूप पाहून ती घाबरली आणि त्यामुळेच एवढं घडलेलं आहे बाकी काही घडलेलं नाही.
मी काय करू म्हणजे ही मुलगी बरी होईल?’
काही नाही तुम्ही हा काळाचा पडदा बंद करा आणि हा परत उघडणार नाही याची काळजी घ्या. एवढं जर तुम्ही करू शकाल तर हिला त्रास होणार नाही. मी तुम्हाला वचन देऊन सांगेन. बाकी तुम्हाला मला जाळायचं असेल, मला काही शिक्षा करायची असेल ती तुम्ही करू शकता. तुम्ही तितके शक्तीमान आहेत. पण यात माझी काहीसुध्दा चूक नाही.
झालं...यज्ञ कुंड शांत झाले. तो आवेश मुलीचा ओसरला. मी तिला जागे करून म्हणालो, बोलं आता काय बोलायच तुला?
बाबाजी. ती मुलगी खाली वाकून नमस्कारकरून आता बोलायला लागली, क्या बताऊं? मुझे कुठ याद नहीं। अब सब अपनासा लगता है। त्याच्याआधी नुसती हसत होती.....
आणि असा तो बिकट प्रसंग बाबांच्या गोल गोल इशाऱ्यामुळे उलथवून लावला गेला. त्यानंतर पुढे तिचं लग्न झालं. तिला एक मुलगा- मुलगी आहे. आता नवरा लेफ्टनंट कर्नल आहे. पण नंतर हा तिला कधीच त्रास झाला नाही.
ही अशी आयुष्यात घडलेली अपमानकारक अपशब्द ऐकून घ्यायची एकमेव घटना की ज्यात मला काहीच कळत नव्हतं. किती तास बसलो. काय करायचं काय. कारण ते पिशाश्च नाहीच आहे. काही कारणामुळे तो काळाचा पडदा सरकला आणि ते तिचेच पुर्वरूद्र रूप बघुन ती घाबरली.
पुढे याच कर्नल य़ादवांनी व घरच्यांनी त्यांच्या घरातून निघताना व नंतर पुण्यात घरी येऊन पुन्हा पुन्हा अजीजीपुर्वक माफी मागितली. त्यानंतर आणखी एका प्रसंगातून कर्नल यादवांनी वेळेवर एकांना केलेली मदत फारच मोलाची होती. त्याचा किस्सा सांगेन नंतर कधीतरी...
-------- पुढे चालू....

13. किस्सा ३परमेश्वराची लीळा... “मुलीला मिळाली नेत्रशक्ती!”

3. परमेश्वराची लीळा...मुलीला मिळाली नेत्रशक्ती!

जीवनामध्ये नवीननवीन अनुभव कसे येतात आणि श्रद्धा कशी बळकट होते याचं आणखी एक उदाहरण. 1982च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये माझी नंबर दोनची मुलगी संजू. तिच्या एका मित्रासोबत खेळत होती. जवळ एक छोटसं बोराचं झाड होतं. त्या मुलाने त्या झाडाची फांदी आपल्याकडे ओढली आणि थोड्यावेळाने सोडून दिली. त्याच्या अगदी विरूध्द बाजूला मुलगी बसलेली होती. झाडाची फांदी एकदम डोळ्याला लागली आणि डोळ्यामध्ये काटा गेला. ती रडायला लागली. त्यावेळेस मी नेमका वडील आजारी असल्याकारणाने गावी गेलो होतो. मिसेसने मुलीला जवळ घेऊन बघितलं. तिच्या डोळ्याच्या पांढऱ्या भागावरती एक काटा दिसला. ती एकसारखी रडत होती आणि डोळा चोळत होती. काटा कोवळाच होता. तिने तो बाहेर काढला. तिला अंघोळ घातली.

दोन मुलं शैलेश आणि अभिजीत लहान होती. एकच मुलगी राजू. थोडी मोठीशी म्हणजे अकरा वर्षांची होती. घरामध्ये सगळ काम बायकोलाच करायला लागयचं. त्यामुळे ती वैतागलेली असायची. त्यात मी घरी नव्हतो. म्हणून तिला मारून कुटून अंघोळ घालून ती झोपवायला लागली. संध्याकाळी तिच्याकडे पाहिले तर डोळा खूप लाल झाला होता. त्यामुळे बायको तिला दवाखान्यात घेऊन गेली. दवाखाना म्हणजे काय काही कॉटचा छोटा दवाखाना. डॉक्टरने पाहिले काय झाले.

बायको म्हणाली, हिच्या डोळ्यामध्ये काल बोरीचा काटा गेला म्हणून भीती वाटते. लहानसा काटा आढळला. तो मी काढला. पण डोळ्यात तर आणखी काही नाही ते बघा. त्यांनी डोळा नीट पाहिला आणि म्हणाले, तुम्ही मूर्ख आहात. तुम्हाला काही अक्कल आहे की नाही. डोळयामध्ये मुलीच्या काटा गेलेला असताना ताबडतोब आणायला नको होतं का? हीचे वडील कुठे आहेत?

तिने सांगितलं की ते गावी गेलेले आहेत. त्यांनी ताबतोब अब्युलन्स पाठवून तिला आगऱ्याच्या एम एच (मिलिटर हॉस्पिटल) मध्ये पाठवले. डॉक्टर हजर नव्हते तिने कसातरी प्रयत्न करून दुसऱ्या डॉक्टरला बोलावलं. डोळ्याचा एक्सरे घेतल्यानंतर डोळ्याच्या एकदम मधोमध सेंटर रेटिनामध्ये एक काटा विराजमान आहे असं त्यांना दिसले. नंतर त्यांनी खूप प्रयत्न करून त्या काट्याला बाहेर काढल्यानंतर डोळ्यावरती फार लाली होती. औषधीसुध्दा दिली. पुढे मी परतलो. मला बोलावलं. खूप शिव्या घातल्या. हिच्याकडे लक्ष द्या. बहुतेक हा डोळा आता पूर्णपणे गेलेला आहे. कारण तिने डोळा चोळल्यामुळे रेटिना पूर्णपणे डॅमेज झालेला आहे. आता काही होऊ शकत नाही. तरीसुध्दा डोळा बरा होईल या आशेच्या किरणांनी मी देवाच स्मरण करीत होतो. ज्यावेळेस दुःख, संकट येतात त्यावेळेस देवाला आपण मनापासून हाक मारतो. अन्यथा ते एक प्रकारचं नाटकच असत असं त्यावेळेस मला वाटलं. मी फार हवालदिल झालो. मोठ्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये घेऊन गेलो. त्यांनीसुध्दा सांगितलं हा डोळा ठीक होऊ शकत नाही. डोळा पूर्ण गेलेला आहे.

तेवढ्यात एक आनंदाची बातमी कळली. मेरठमध्ये एक सरदारजी डॉक्टर बावा डोळ्याचे महातज्ञ म्हणून कळले. त्यांनी पुष्कळ लोकांचे डोळे नीट केले म्हणून त्यांच नाव होते. कसंतरी करून त्यांच्याकडे गेलो. पन्नास रूपये फी भरून... त्यांनी मला सगळं विचारलं... नांव-गाव काय करता वगैरे. मुलीला तपासलं, तपासल्यानंतर मला बाहेर घेऊन सांगितलं या मुलीच्या डोळ्याला मी काही करू शकत नाही. डोळा पूर्ण डॅमेज झालेला आहे. जगामध्ये हा डोळा कोणी नीट करू शकत नाही. पण घाबरू नका आता सूज ओसरत चाचली आहे, ती पूर्ण उतरल्यांनतर आणखी एक-दोन वर्षांनी आपण तिला आर्टिफिशियल आय लावू आणि तो असा लावू की तो आर्टिफिशियल आहे हे ओळखू पण येणार नाही.

मी परत आलो. फार उद्विग्न झालो होतो. पगार एकदम कमी, घरी मदत करायला लागायची. कसं करायचं काही कळत नव्हतं. असच जवळच्या पिक्चर हॉलमध्ये त्यावेळेस एक पिक्चर लागला तो पाहायला गेलो. अर्धा पिक्चर झाल्यानंतर विषण्ण मनानं बाहेर आलो. मोठं ग्राऊंड होतं समोर, तेथे डाकोटा नावाचे कॅटीन होते. त्याच्या मागेच ग्राऊंड होतं. तिथेच एका फलकावर जाऊन बसलो आणि नुसताच एकट्याशी बोलत होतो. बहुतेक पौर्णिमा असावी त्यादिवशी. पूर्ण चंद्र वरती येत होता. मी चंद्रालाही शिव्या घातल्या. अरे तु म्हणे सुख देणारा. मला थोडं तरी सुख दे. एकतर ब्राम्हणाच्या घरात जन्म मिळालेला आहे. घरी अतिशय गरीबीची स्थिती आहे. त्यात मी जर चुकलो असेल, माझ्या हातून जाणूनबुजून चुका झाल्या असतील तर त्याची शिक्षा मला दिलीत तर ती मला मान्य आहे. परमेश्वरा, नाथा. पण माझ्या लहान मुलीने काय अपराध केला. अजुन तर तीची नऊ वर्षाचही वय पूर्ण झालेलं नाही.

सदगुरू हे काय आहे. मदत करा.

तेवढ्यात एक जवळजवळ सात फुटाचा नाग माझ्याकडे जोरात येऊ लागला. ते पाहिल्याबरोबर मी जोरात पाय त्याच्यासमोर ठेवला व म्हणालो, चाव-चाव मला लवकर चाव, तिच्या आधी तरी मला घेऊन जा. तुझं कल्याण होवो.

त्या सापालासुध्दा काय वाटलं माहित नाही. त्याने रस्ता काढून तो तिथून सळकण निघून गेला. घरी आलो. अहो तुम्ही लवकर कसे आलात? पिक्चर सुटला का?,

म्हटलं नाही, माझं मन लागत नव्हतं म्हणून घरी आलो.,

मग तुम्ही थोडं जेवून घ्या.

नको मला जेवायची इच्छा नाही.

तिने खूप आग्रह केला. तेव्हा थोडासा भात खाल्ला. परत मुलीच्या अंगावरून हात फिरवला आणि झोपी गेलो. मध्यरात्री केव्हातरी दोन-तीन वाजता एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये दोन साधू आले. हिंदीमध्ये म्हणाले, क्या हो गया? क्यु दुःखी है?’

तुम्हाला माहितीय मुलीची काय अवस्था आहे. त्यामुळे मी दुःखी नाहीतर काय आनंदी होऊ.? नही बेटे, वैसे चिंता की कोई बात नही है। तेरा तेरे गुरूपर विश्वास है ना?

हा मेरा बहोत विश्वास है। लेकिन क्या करे, ज्यो भाग्य में वो तो में बदल नही सकता और शायद गुरू नही बदलना चाहते। उनकी मर्जी है।

बेटे ऎसे निराश मत हो। ये भस्म तेरे पास रखा है, ये उसकी आँखों पे घुमाते जा। यदी प्रभु ने चहा तो उसकी आँख ठिक हो जाएगी।

सकाळी ही गोष्ट बायकोला सांगितली. ती म्हणाली एकसारखा तुम्हाला मुलीचा डोळाच दिसतो आहे. एकसारखं तुम्हाला तेच तेच आठवतंय म्हणून तुमच्या मनातल प्रतिबिंब तुम्हाला स्वप्नामध्ये दिसलेलं आहे.

अहो गेलेला डोळा कधी परत येतो का? तो आता फुटलाय. काचेचा फुटलेला ग्लास कधी नीट होतो का? नाही ना. मग आपल्या नशिबात जे आहे ते सहन करायलाच पाहिजे.

मीही गप्प बसलो. सकाळीपासून मुलीच्या डोळ्याला रोज भस्म लावू लागलो. काही दिवसांनी मुलगी म्हणाली, बाबा मला आता डोळ्याने वाचता येतं.

म्हटलं, दाखव बघू वाचून. घरात मोठं कॅलेंडर होतं, त्यातल्या मोठ्या तारखा मात्र तिने मला बरोबर सांगितल्या. तिला अंधुस दिसत होतं. मला परत हुरूप आला.

मी क्षणाचाही विलंब न लावता तीन दिवसांची सुट्टी घेऊन परत मेरठला गेलो. तिथे डॉक्टर बावांना मुलीला दाखवलं. परत पन्नास रूपये भरले. ते म्हणाले, याच्या पूर्वी ती इथे आली होती का? म्हणलो, हो.

डॉ. म्हणाले, त्याचे डॉक्युमेंट आहेत का?’ ते डॉक्युमेंट मी त्यांना दाखवले. त्यांनी डॉक्युमेंट घेऊन क्षणभर दृष्टी टाकली. म्हणाले, तू मुरख है, अज्ञानी है। भाई, पचास रूपये बहोत जादा होते है। क्या तनख्वॉ मिलती है तुजको?’

तीनसो रूपये मिलती है।

फिर क्यु पचास रूपया खर्चा कर रहा है? ले जा तेरे पैसे। क्यु ऐसा कर रहा है? उसको कोई नही दिख रहा है। वो पागल है, बच्ची है छोटी है, तु तो बडा है ना। तुझे तो अकल है ना। देख ये एक्स-रे पुरा रेटिना फट गया है अंदरसे। वो ठिक नही हो सकता, जाओ।

परत मी त्यांना मी त्यांना सांगितलं, अहो आता तर मी पैसे भरलेच आहेत. आपण एकदा चेक करून घ्या ना.

ठीक है, तेरेपास जादा पैसे हो गये है, तो मै चेक करता हूँ। मेरा तो क्या धंदाही है।

परत त्यांनी तिला टेबलवरती घेतली. मी बाहेर बसलो होतो. पाच-दहा मिनिटांनी ते बाहेर आले. मी पण आशेने त्यांच्याकडे धावत गेलो आशेने. म्हटलो, डॉक्टरसाहेब, काय झालं हो?

हा-हा मै बाद में बताता हूँ। मुझे अभी थोडासा काम है। फिर मैं आता हूँ. कही जाना नही। यही बैठे रहो।

असं म्हणून तो डॉक्टर निघून गेला. पंधरा मिनिटांनी तो परत आला. आला तेव्हा त्याच्याकडे मोठं पेढ्याचे पाकिट होतं. जवळजवळ अर्धा-एक किलो पेढे असतील ते. एक नारळ, एक कापड आणि शंभर रूपयाची नोट त्याने माझ्या चरणावर ठेवून मला अक्षरशः नमस्कार केला. विचारलं, तु कोण आहेस? फौजी आहेस पण कुठला आहेस? सगळी चौकशी केली.

मैं तो मिरॅकलपर विश्वास नही रखता लेकीन ये तो मिरॅकल हो गया। इसकी आँख अपनीआप जुटने लगी है। शायद जिंदगी में आगे देखभी पायेगी ये कह नही सकता देखेगी या नही।

डॉक्टरसाहेब काहीतरी औषध तरी द्या हो.

दवा से कुछ नही होगा इसे. ये ऐसाही उपरवालेने चाहा तो ठिक होता है। गुरू की ताकद बहुत है। बाबा नानक तुझपर दया जरूर करेंगे। असं म्हणून त्यांनी मला प्रेमाने मिठी मारली.

तसाच घरी आलो. त्यावर बरेच दिवस गेलं आणि खरं वाटणार नाही तुम्हाला हळुहळू त्या मुलीचा पूर्ण बरा झालाय. आज संजू जवळजवळ चाळीस वर्षाची विवाहिता आहे. तिचा फुटलेला डोळासुध्दा 99.99 टक्के अजुन एकदम चांगला आहे. ती सुईमध्ये दोरासुध्दा ओवू शकते.

अशी ही परमेश्वराची लीळा आहे. म्हणून म्हणतात की, खऱ्या अंतःकरणाने देवाची पूजा केली, भक्ती केली, त्यांच्या पुढे विनम्र झालं, तर परमेश्वर काहीही करण्यासाठी तयार असतो. पण आपण प्रत्येक ठिकाणी कमी पडतो. कमी पडतो, कमी पडतो. कारण या मायारूपी जगामध्ये आपण वावरत आहोत. वासनांनी पूर्णपणे घेरलेलो आहोत. बुध्दि असुनसुध्दा विवेक पूर्णपणे संपलेला आहे. कशाच्यामागे आपण धावतोय हेच आपल्याला कळत नाही. रथचक्र हे हळुहळू पुढे जात आहे. अलख निरंजन! समाप्त