५. संत श्रीरंगावधूत महाराजांची भेट!
मधे एकदा पोट बिघडले. अशक्तपणा आला. सहा लोकांसाठी जो संडास होता तिथे खाली मला धरून कसातरी संडासामध्ये ठेवायचे. तिथे संडास करून मी वरती यायचो. कि पुन्हा धावाधाव. पोटामध्ये जास्तीत जास्त दोनचार चमचे अन्नपाणी जायचं बळजबरीनं किंवा थोडसं दूध. खपू झालं मग भाऊ आला तो म्हणाला, ‘इथं राहून काय करतोस तु गावी जा.’ पण मी म्हटलं, ‘गावी तर अठराविश्व दारिद्र्य आहे. मला प्रवासही होत नाही मग मी कसा काय घरी जाणार.’ खुप दुःखी झालो. हे तुझ्या कर्माचं फळ म्हणून सगळे बोलले. मलाही कळलं की येथे येऊन आपल्या हातातून चुकी झालेली आहे. पण आता काही उपाय नव्हता. मग त्यावेळेस तिथे एक फार मोठे संत डॉ. वाण्याकडे यायचे. ते तिथे आले. त्याचं नाव श्रीरंगावधुत महाराज. त्यांच्याकडे मला घेऊन गेले. त्यांनी मला पाहिलं. डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, ‘जा आता काही त्रास होणार नाही.’ घरी आलो खूप आनंदीत झालो. चला आपला त्रास गेला म्हणून चालायला लागलो. थोडा फिरायला लागलो. त्यामुळे अंगात चैतन्य आलं.
मध्यंतरीच्या काळात मला स्वप्ने पडू लागली. राक्षत्री बारा झाले की एक फार चमत्कारिक व्यक्तिमत्व सामोरे यायचे. काही तरी समोरटाकून त्याच्याकडे पहा म्हणायचे. मला काही दिसत नाही असे मी म्हटले की पहा. पहा म्हणून सुचवायचे. त्यांच्या धिप्पाड शरीरावरून ही असमी कोणी मानवापेक्षा वेगळी असल्याने माझी भितीने गाळण उडे व मी त्या स्वप्नाला टाळायला जागा राहायचा प्रयत्न करी लागलो. पहाटे उठून कामाला जायचे असल्याने हळू हळू माझ्या तब्बेतीवर परिणाम झाला व मी आजारी पडलो. घरातील लोकांना सांगून उपयोग नव्हता. आधीच माझ्यावर खार खाऊन असलेले बंधू व वहिनींना आणखी एक कारण नको म्हणून मी गप्प होतो. नंतर ताण असह्य झाल्यावर सांगितले कि असे असे कोणी प्रचंड देहधारी मला भेटतात. गेले सहा महिने. मला भिती वाटते काही तरी इलाज करा.
एकदा एका महाराजांच्याकडे मला नेले गेले. त्यांनी आता ठीक झालास. जा. आता काही होणार नाही म्हणून समजूत घातली. पण परत रात्री तेच स्वप्न. परत मी जागा झालो. मग सात दिवसांनी परत त्यांच्याकडे घेऊन गेले. महाराजांना जायचं होतं फार गडबड होती. पण तरी त्यांनी आमचं ऎकलं. त्यांना सांगितलं, ‘अहो सात दिवस होऊन गेले. काहीही फरक पडलेला नाही.’
‘असं होतं? मी आत्ता पाहतो’ म्हणून मला त्यांनी अंघोळ घातली. एक नव धोतर नेसवलं. मी बसलो त्यांच्या समोर. त्यांनी डोळे मिटले. कसलं ध्यान केलं काहीएक माहित नाही. मग उठून महाराज म्हणाले, ‘इधर आओ’ आणि मली मिठी मारली. मला काहीच कळेना. मी ताबडतोब मिठीतून मोकळा झाल्यानंतर नमस्कार करायला गेलो. त्यांनी लगेच हात धरला. म्हणाले, ‘नाही नाही नमस्कार करू नका. महाराज नमस्कार करू नका.’ मी म्हटलं, ‘काय झालं हो.’
‘अहो तुम्ही पूर्वजन्मीचे नाथसंप्रदायी आहोत. ती जी व्यक्ती येते ती नवापैकी एक कोणीतरी आहे. मी त्यांचं नाव तुम्हाला सांगू शकत नाही. फक्त ऐवढेच सांगू शकतो की नवापैकी एक कोणीतरी आहे. ते नवनाथांपैकी आहेत. तुमचं काही वाईट करायला आलेले नाहीत ऐवढे मी निश्चित सांगतो. तुमचं भविष्य फार चांगलं आहे. काही चिंता करू नका असे म्हणून मग त्यांनी मला एक नारळ आणि एक पेढा दिला. तो घरी घेऊन आलो.
आपण आपले अनुभव केंव्हा कळवणार?
ReplyDelete