आमचे चितळे बाबा

आमचे चितळे बाबा
आपल्या नेहमीच्या स्थानावर विराजमान

Tuesday 11 December 2018

देऊळगाव राजा गावातील गमती जमती...चितळेबाबा - वेदांचा अर्थ न कळे आम्हा !

चितळेबाबा वेदांचा अर्थ न कळे आम्हा !
दि. 24 डिसे. 2012 रोजी अनेक विषयांवर चर्चा करताना पु. चितळेबाबा वेद निर्मितीबद्दल विचारले तेंव्हा त्यांच्याबद्दल बाबा आपला अनुभव सांगताना म्हणाले, "एकदा मी एके दिवशी गुरू जालंघर महाराजांना अतिशय नम्रपणे विचारले, हे गुरूचारी वेद जे अति श्रेष्ठ आहेत व ते व्यासांमुळे जगाला ज्ञात झाले आहेत. त्यांचे वान करायची इच्छा झाली आहे तरी मला आज्ञा द्या आधी त्यांनी काही सुचवले नाही म्हणून, पण नंतर पुन्हा विनंती केली तेंव्हा दृष्टांच देऊन ते म्हणाले, वाचूनिया वेद तुला होईल खेद । तयातील भेद तु न जाणे।।'  यावर मी पुष्कळ दिवस विचार करत होतो. नंतर मी तो विचार सोडला ते कळले ही नाही
देऊळगाव राजा गावातील गमती जमती...
बंधू श्री अशोक यांनी बाबांची आठवण लिहिताना म्हटले होते की एकदा वडिलांना अंथरुणातून उठून बसायला अशक्य झाले इतका अशक्तपणा आल्याने त्या तीव्र आजाराबद्दल आईने तात्याला तो सुटीवर आला तेंव्हा म्हटले, बघ त्यांना काय झालेय ते. पुढे त्यांनी म्हटले होते की तात्याने लगेच वडिलांचा आजार बरा केला. ते करताना वडील 2-3 फूट अधांतरी हवेत बराच वेळ होते. ते मी स्वतः पाहिले... नंतर अकस्मात बरे झाले याबद्दल त्यांनी म्हटलयं.
 ... ती गोष्ट आठवते का? असे मी बाबांना विचारले असता त्यावर चितळेबाबा म्हणाले, असेल बुवा. पण मग जेंव्हा हवेत वडील अधांतरी झाले त्याची घटना असे अशोकजींनी पुढे म्हटलेय असे विचारल्यावर बाबा पटकन म्हणाले, ते होय... हो,  आठवते की. अहो, ती तर भानामती झाली होती!  मंत्रून घालवल्यावर वडील नंतर बराच वेळ अधांतरी होते. व लगेच खडखडीत बरे झाले’.
गोविंदराव आफळे बुवांची फिरकी!
 आणखी एक मजेशीर घटनेची बाबांनी सांगितलेली एक आठवण...
ते म्हणाले, एकदा मी गावी सुट्टीत गेलो असताना असताना एकजण कोणी 'भूतनाथ' म्हणून आहेत त्यांना भेटायला लांबून आलोय म्हणत मला भेटायला आले. सोबत आमच्या गावातील बडे धेंड आबासाहेव बक्षी पण होते. मी बालाजी मंदिराच्या आसपास बिडीचे झुरके घेत होतो. त्या अवस्थेत मला पाहून ते ग्रहस्थ ओरडले, बिडी फेक आधी ती. मंदिराच्या पवित्र जागी हा काय अनाचार?’ म्हणून त्यांनी बाबांची कान उघाडणी करीत म्हटले.  
मला राग अनावर झाला. मी कोण आहे तुला माहीत आहे का? मी म्हणालो, ओ आणि कोण तुम्ही? तो देव सर्वत्र आहे. मग मी इथे बिडी प्यालो काय किंवा इतर ठिकाणी तर काय झाले वेशावरून दीड दमडीचा भिक्षुक तू दिसतोय, तुला काय करायचे आहे? आमच्या गावात दर्शनाला आलायस तर मग ते घे व जा... मघे पडत बक्षी म्हणाले, आफळे महाराज, अहो जाऊ द्या, त्याच्या नका नादी लागू. तो तसाच आहे!  आम्हाला गावात राहायचे आहे. आपण कशाला उगीच त्याची छेड काढता आहात 
आबासाहेब पुढे  म्हणाले, अहो आपण ज्याला भेटायला म्हणून इथे आला आहात ते हेच भूतनाथ होत! 'अरे बापरे', म्हणत आपला ताव सोडून आफळे बुवांनी बाबांना विनंती केली, महाराजा, एका नाथपंथीय औलियाना भेट असा मला स्वप्नात आदेश आला म्हणून मी खूप शोधाशोध करून आपला माग काढत इथवर आले आहे. आपली माझ्याकडून आगळीक झाली त्याबद्दल मला माफ करावे. दुसऱ्या दिवशी मग 'आहेर करू इच्छितो' म्हणत धोतर-नारळ घेऊन सकासकाळी, आहेत का धनू?’ म्हणत ते आत आले. त्यावेळीचा माझा अवतार वेगळाच होता. कारण माझे वडील तेंव्हा पॅरेलेसिसने आजारी होते. विकलांग झालेले. त्यांची विष्ठा काढावी लागत असे. तसे करताना त्यांनी मला पाहिले. हात धुवत धुवत मी आफळे महाराजांना सामोरा गेलो. मातापित्यांची सेवा करताना कसली आलीय लाज?... माझा अवतार पाहून आफळे बुवांचा रागरंग बदलला होता. नाथ महाराजांची आपल्यावर कृपा झाली आहे असे कळल्याने प्रत्यक्ष भेटील आलो होतो. वडीलकीच्या नात्याने बोललो त्याचा राग मानू नये...
*ते होते राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून ख्यातनाम गोविंदराव आफळे बुवा... नंतर अनेकदा बाबा त्यांच्या कीर्तनाचा आस्वाद घेतला.

 वरील घटनेचे एक साक्षीदार होते प्रतिष्ठित धुंडिराज महाराज कवीश्वर म्हणून. त्यांचीही एक मजा आता सांगतो. एकदा धुंडिराज कवीश्वरांना दृष्टांत झाला की त्यांना पुढचा मार्ग तो (धनू) दाखवेल. ते म्हणजे, सध्याच्या दत्त महाराजांचे वडील. धुंडिराजजी 104 वर्षे जगले. त्यांचे वडील वक्रतुंड महाराज. त्यांच्याबद्दल निजामाच्या राज्यात त्यांनी सुर्यास्त थांबवला अशी नोंद आहे. तर त्या धुंडीराज महाराजांची आधीची एक आठवण बाबांनी सांगितली. ते म्हणाले, धुंडिराज महाराज, एकदा रस्त्यात गाठ पडले व म्हणाले, 'मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी भेटाला तुझ्या घरी येऊ काय? का बरे, मी त्यांना म्हटले, आपण कशाला कष्टता, मीच आपल्या घरी येतो ना. तसा गेलो. ते मला म्हणाले, महाराज नमस्कार, आणखी किती आयुष्य मला आहे?  आज प्रश्न विचारायच्या वेळी आम्ही 103 वर्षांचे झालो. 4 मुले 80 च्या वर गेली. आम्हा अजून किती राहिलेत?  यावर मी  एकदम म्हणालो, 'वासनांची तृप्ती नाही म्हणून अडकला आहात.' माझ्या न कळत इतक्या वृद्ध व्यक्तीला मी का असे म्हटले माहीत नाही. पण तरीही तसे उत्तर दिले खरे. मी पुढे म्हणालो, उत्तरायण लागले की 17 दिवसांनी म्हणजे 7 जानेला अंतिम वेळ असेल. ते नेमके त्याच दिवशी निवर्तले.

No comments:

Post a Comment